तालुक्यात शासनाने धार चातारी येथे शासकीय रेती घाट नियोजित केले असून अवैध रेती उत्खनन करणारे रितीमाफिया धार चातारी घाटाच्या नावाने तालुक्यातील उंचवडद येथून खुलेआम पैनगंगा नदी पात्रातून रेतीची वाहतूक केली जात आहे त्यातच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी ” तेरी भी चुप मेरी भी चूप ” अशी भूमिका घेत रेती माफियांचे हात बळकट केले आहे .
विदर्भ व मराठवाड्यातील पैनगंगा नदीच्या तीरावर धार चातारी लागूनच असलेला पेंड उंचवडद असून इथून मराठवाड्यातील व विदर्भातील रोज शेकडो बर्रास रेती अवैध उत्खनन करण्याचा सपाटा मराठवाड्यातील व विदर्भातील रेतीमाफीयांनी लावला असून याकडे प्रशासनाचे कोणत्याही प्रकारे लक्ष नसून दुर्लक्षच होत आहे. असे नागरिकात जोरदार ओरड असुन चर्चेला उदान आले आहे.
मागील काही दिवसापूर्वी उमरखेड महसूल प्रशासनातर्फे एक कर्मचाऱ्यासह शासकीय वाहन पाठवले होते. परंतु काही प्रशासनाच्या चेले चपाट्यांनी रेतीमाफीयांना सदर वाहनाची माहिती दिल्यानंतर सदर वाहन कोणतीही कारवाई न करता खाली हाताने परत आले परंतु त्यानंतर ही उंचवडद पेंडावर फार मोठ्या प्रमाणे अवैध उत्खनन होत असून मराठवाड्यातील प्रशासन असो किंवा विदर्भातील प्रशासन असो यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही . वरिष्ठ पातळीवर सदर प्रशासनावर वचक आहे काय यांना कुणाचं पाठबळ ? यांचा पाठीराखाण कोण आहे? हजारो ब्रास मराठवाडा व विदर्भाच्या पैनगंगा नदी तीरावरील उत्खनन होत असताना सुद्धा यावर कुठलेही ठोस कारवाई होत नाही त्याचे मूळ कारण काय ?
पैनगंगा नदी पात्रात जे झालेले उत्खनन हे विदर्भ व मराठवाडा जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी याची मोजमापन करून ज्या विभागातील जे कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.
पैनगंगा नदीची उंचवडद पेंडावर ज्या पद्धतीने नदीपात्रात चाळणी करण्यात आली त्याच पद्धतीने इतरही ठिकाणी मराठवाडा असो किंवा विदर्भ असो दोन्ही बाजूला नदी पात्रात उत्खनन केलेल्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी व वरिष्ठांनी जातीने लक्ष द्यावे ही मागणी नागरीक करीत आहेत.
