section and everything up until
* * @package Newsup */?> मंगरुळपीर येथे गौणखनिज तस्करी……..! | Ntv News Marathi

एसडिएमने अवैध गौणखनिज वाहतुक करणार्‍या दोन ट्रक्टरवर केली कारवाई

गौणखनिज वाहनांचा पाठलाग करुन कारवाईसाठी घेतले ताब्यात

फुलचंद भगत
वाशिम:-तालुक्यात सर्रास अवैधपणे गौणखनिजांची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा दि.६ जुनच्या कारवाईमुळे अधोरेखीत झाले आहे.येथील ऊपविभागीय अधिकारी वाशिमवरुन येत असतांना दस्तापुरनजीक दोन ट्रक्टर अवैध गौणखनिजांची वाहतुक करीत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे वाहनांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.


महसुल विभागाने गौणखनिज तस्करीबाबत कायदे कडक केले परंतु तरीही काही तस्कर खुलेआम रेती,गिट्टी,माती,डस्टची अवैधपणे वाहतुक करुन महसुल विभागाच्या डोळ्यात धुळ फेकुन महसुलाला चुना लावण्याचे काम करतात.अशा गौणखनिज तस्करावर वेळोवेळी अधिकार्‍यांनी कारवायाही केल्या आहेत परंतु तरीही हा गोरखधंदा समुळ नायनाट होण्याचे नाव घेत नसल्याचे सध्या चिञ आहे.मिळालेल्या सुञानुसार मंगरुळपीर येथील ऊपविभागीय अधिकारी हे आपले शासकीय कामकाज आटोपुन मंगरुळपीर कडे परतीला येत असतांना तालुक्यातील दस्तापुरनजीक दोन काळ्या मातीचे ट्रक्टर अवैधपणे वाहतुक केल्याचे निदर्शनात आले.सदर बाबीची पडताळणी केली असता कुठलीही परवानगी नसल्याचे समजल्यावर कारवाईसाठी ती दोन वाहणे तहसिलला आणन्याचे आदेश दिले.पण सदर वाहनधारक पळुन जावु नये म्हणून पुढे गौणखनिजांची ट्रक्टर व मागे साहेबांची गाडी असा प्रवास सुरु झाला तरीही वाहनचालकांची चलाकीचा अंदाज आल्याने साहेबांनी थेट पोलिसांना प्राचारण केले.त्यानुसार पोलीसांनी ११२ गाडी तात्काळ रवाना होवुन दोन्हीही गौणखनिजांची वाहणे पोलिसांच्या सहकार्यांने पोलिस स्टेशनला आणली.सदर वाहनांवर काय कारवाई होईल?कीती दंड आकारल्या जाणार?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.वृत्त लिहीपर्यत कारवाई सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *