राजकीय वारसा असलेल्या खिराडे कुटुंबियांकडुन राजकारणाचे मिळाले बाळकडु
फुलचंद भगत
वाशिम:-तत्कालिन वाशिम मतदारसंघात होवुन घेलेले दोन आमदार आणी त्यांचा राजकीय वारसा सुरु ठेवत सध्याही मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचातच्या जनतेतुन निर्वाचित सरपंच सौ.सुनिताताई अजय खिराडे या वाशिम मंगरुळपीर विधानसभेसाठी निवडणुक लढवण्यास इच्छुक असुन दोन आमदाराची नातसुन असलेल्या ऊच्चविद्याविभुषीत सुनिताताईलाही नक्कीच आमदारकीचा मुकुट मिळणार अशी जनतेतुनही चर्चा ऐकावयास मिळत आहे.
सन १९६७ मध्ये तत्कालीन वाशिम विधानसभा मतदारसंघातुन मारोतराव काशिराम खिराडे हे आमदार बनले त्यानंतर मनाबाई मारोतराव खिराडे ह्या सुध्दा सन १९७२ मध्ये आमदार झाल्या होत्या या दोन आमदाराचे नातु असलेले अजय खिराडे हे सध्या महसुल विभागात नोकरीला आहेत आणी याच अजय खिराडे यांच्या सुविद्द पत्नी ज्या ऊच्चविध्दाविभुषीत आहेत त्या सौ.सुनिताताई अजय खिराडे या सध्या मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठी गट ग्रामपंचायत असलेल्या जांब,शहापुर,सोनखास,अजगाव च्या सपपंच आहेत.त्या दोन वर्षापुर्वी जनतेतुन सरपंच म्हणून निवडुन आल्या आहेत.दोन आमदारांचा वारसा आणी त्या दोन आमदाराच्या नातसुन असलेल्या सुनिताताई यांचा वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघातुन आमदारकीची निवडणुक लढवण्याचा मानस असुन त्या नक्कीच राजकारणाचे बाळकडुन मिळवलेल्या घराण्यातला वारसा टिकवण्यास पुन्हा यशस्वी होतील असा विश्वास जिल्हावाशीयांना वाटत आहे.सुनिताताई खिराडे या ऊच्चविद्याविभुषीत असुन शालेय वयापासुनच त्यांना समाजकारण आणी राजकारणाची आवड आहे.विविध समाजपयोगी ऊपक्रम राबवुन सामाजीक प्रश्नांवर काम करुन लोकांना न्याय देण्याची त्यांची सदैव भुमीका राहलेली आहे.महिलांच्या समस्या शासनापर्यत पोहचवुन महिलांना स्वबळावर ऊभे करण्यासाठी गृह आणी लघुऊद्दोगासाठीही त्यांचे महत्वपुर्ण योगदान लाभलेले आहे.कोरोनाकाळात तर सुनिताताईने जनसामान्यांच्या स्वतःला वाहुन घेतले होते.पर्यावरण संवर्धनासाठी प्रामुख्याने त्यांनी कार्य केले असुन घरोघरी वृक्ष भेटी देवुन वृक्षारोपणालाही चालना दिली.माजी आमदार मनाबाई खिराडे व मारोतराव खिराडे यांचे माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे यांचे अतिशय घनिष्ठ संबध होते तसेच ते नात्यातही होते.गोवा मुक्ती संग्रामातही या आमदारांचे मोलाचे योगदान लाभल्याने त्यांचीच नातसुन असलेल्या सुनिताताईनेही या खिराडे परिवारातुन राजकीय बाळकडु मिळाले आणी त्या सर्वात मोठ्या ग्रा.प.च्या जनतेतुन सरपंच झाल्या त्या आपल्या जनसंपर्क,सामाजिक कार्य आणी महिलांच्या संघटनामुळेच.जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास यावेळी राखीव असलेल्या वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघातुन निवडणुक लढवुन जनतेची सेवा करण्याची इच्छा सुनिताताई खिराडे यांनी व्यक्त केली असुन त्यासाठी त्या राजकीय कार्यासाठी कामालाही लागल्या आहेत
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206