राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व पानमसाला विकणा-या एकावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून एक लाख ७ हजार ४२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अहद इसाक इनामदार (वय २३)रा. आलमगीर मदरशाच्या पाठीमागे, भिंगार, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दि. १६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील नगर अर्बन बँकेसमोरील कॅन्टोन्मेंट लॉनच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक मोपेड दुचाकी (एमएच २३ बीएफ ८४१३) व गुटखा, पानमसाला असा एकूण १ लाख ७ हजार ४२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोहेकॉ सुयोग सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यामार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोसई दत्तात्रय शिंदे, पोहेकॉ सुयोग सुपेकर,पोना हेमंत खंडागळे, पोकॉ सागर द्वारके, मपोकॉ पूनम टिळेकर व राधिका वाघ यांच्या पथकाने केली.