नगरच्या उड्डाणपुलावर काल (शनिवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक उड्डाणपुलावरील वळणावर पलटला. ट्रकमधील सिमेंटचे ब्लॉग उड्डाणपुलावरून खाली पडले. या अपघातात ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते.

सिमेंटचे ब्लॉग घेऊन निघालेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक उड्डाणपुलावरील वळणाच्या कठड्याला धडकून पलटला. ट्रकमधील काही सिमेंट ब्लॉग उड्डाणपुलावरून खाली पडले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
