पाथर्डी — अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री.क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले होते.सोमवारी पहाटे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,आमदार मोनिकाताई राजळे,आमदार सुरेश धस,वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे,मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली.श्री.क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री.क्षेत्र पैठण येथून सुमारे पाच हजार तरुणांनी पायी गंगाजल आणून वृद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर सकाळी दहा वाजता जल अभिषेक घालण्यात आला.सकाळी सहा वाजल्यापासूनच श्री.क्षेत्र वृद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी श्री.क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.वृद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांसाठी स्वतंत्र दर्शन बारीची व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,त्याचबरोबर भाविकांच्या दोन चाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.श्री.क्षेत्र वृद्धेश्वर येथे दर्शनासाठी आलेले हजारो भाविक स्वयंभू पिंडीचे दर्शन घेऊन श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान,चैतन्य कानिफनाथ देवस्थान,मोहटादेवी गड या ठिकाणी देखील दर्शनासाठी जात होते.तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त घाटशिरस,मढी,सावरगाव,तिसगाव रस्ता अक्षरशः भाविकांनी फुलून गेला होता.नगर,आष्टी,पाथर्डी,शेवगाव तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो भाविक स्वयंभू वृद्धेश्वराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येथे दाखल झाले होते.सोनई येथील तरुणांनी श्री.क्षेत्र वृद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर आकर्षक फुलांची सजावट केली होती.वृद्धेश्वर या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने विविध विकास कामे सुरू असल्याने भाविकांनी देखील या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले.सोन्याचा डोंगर म्हणून ओळख असलेल्या वृद्धेश्वर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे नदी नाले बंधारे तुडुंब भरले असून या परिसरात पाणी खळखळून वाहत असून डोंगर परिसर हिरवागार झाला आहे.भाविकांमधून येथील संपूर्ण निसर्ग सौंदर्य पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्युज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *