नियोजनबद्ध विकास कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत असून आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आतापर्यंत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात गेला असून पुढील काही महिन्यांमध्ये बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागलेली दिसेल त्या पुढील काळात नवनवीन संकल्पना राबवून महाराष्ट्रात एक विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

गुलमोहर रोड मॉडर्न कॉलनी येथे माजी नगरसेविकाअमोल गाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी माजी नगरसेवक अजिंय बोरकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल गाडे, संपत नलवडे, मयूर कुलथे, आरिफ शेख, जितू गंभीर, सुनील गायकवाड, सचिन लोटके, आसिफ खान, दिलीप कुलकर्णी, मनीष शेळके, अजय साबळे, सुमित महाजन, मुकुंद बेरड, राजेश तोतरे, कार्तिक मंडल, सुनील टकले, अनिल टकले, युवराज कुलथे, आदिराज शेळके, अभिजीत देशमुख, बाळासाहेब देशमुख, श्रीधर शेळके, हरिभाऊ देशपांडे, एडवोकेट समीर शेख, आदी उपस्थित होते, 

अमोल गाडे म्हणाले, की मॉडर्न कॉलनी परिसरातील ड्रेनेज लाईन व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम प्रलंबित होते हे काम आता पूर्ण होणार आहे प्रभागातील एक एक काम हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावले आहे, जमिनी अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन ड्रेनेज लाईन काम पूर्ण केल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतले आहे असे ते म्हणाले.आसिफ खान म्हणाले, आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने नगर शहराला चांगले नेतृत्व मिळाले असून त्यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेवून विकासाची कामे मार्गी लावली जात आहे, तसेच ते नागरिकांच्या थेट संपर्कात असल्याने नागरिक देखील आपले विविध प्रश्न समस्या हक्काने त्यांच्याकडे मांडत असतात आणि ते सोडवलेही जातात, त्यांचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.माजी नगरसेवक अजिंय बोरकर, संपत नलवडे, मयूर कुलथे आदींची भाषणे झाली.