गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे
दर्पणकार बाळशास्त्रीय जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी मध्ये सुभान शहा यांनी अभ्यासक्रमांचे अध्ययन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी) भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आली होती या परीक्षेमध्ये नामांकित दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे गंगापूर तालुका प्रतिनिधी सुभान शहा,
यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे. त्याबद्दल सदरील संस्थेतर्फे सुभान नन्हू शहा यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदरील प्रमाणपत्र (अकॅडमी) चे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे व अध्यक्ष कृतिका संदीप मराठे यांच्या सहीनिशी सदरील प्रमाणपत्र सुभान शहा पत्रकार यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.