तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

धाराशिव :
उमरगा तालुक्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याने तालुका काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दि 20 मे रोजी शहरातील महावितरण कार्यालयाला भेट देत अभियंत्यांचा सत्कार करून गांधीगिरी आंदोलन केले.यानंतर शहरातील औटी प्लॉट येथील मस्जिद ते जाधव बंधारा कोंक्रीट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झालेबाबत निवेदन दिले.
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील आठ ते दहा दिवसांपासून चालत असलेल्या विजेच्या लपंडावाबाबत महावितरणच्या अभियंत्याचा उपहासात्मक सत्कार करून जाब विचारण्यात आला. याबाबत तात्काळ उपाययोजना आखून शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यानंतर शहरातील औटी प्लॉट मधील औटी मस्जिद ते जाधव बांधारा काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले बाबतचे निवेदन नगर पालिका प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,उमरगा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या औटी प्लॉट मधील औटी मस्जिद ते जाधव बांधारा या रस्त्याचे काम एक महिण्याच्या आत झाले आहे. परंतू एक महिण्याच्या आतच त्या रस्त्याला भेगा पडल्या असुन जगोजागी खड्डे पडलेले असुन जागोजागी रस्ता उखडला आहे. या मुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा अंत्यत दर्जाहिन झालेला आहे. दर्जाहिन काम केलेल्या गुतेदारावर योग्य ती कार्यवाही करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.कार्यवाही न केल्यास कॉंग्रेस पक्षा तर्फे तिव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार,आश्लेष भैया मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, नानाराव भोसले,विजय दळगडे, शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे,बाबा मस्के, राहुल सरपे, मशाक शेख, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष सोहेल इनामदार, प्रकाश चव्हाण, जालिंदर सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.