CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २६ जून रोजी वाहेगाव परिसरात सध्या खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये रांग लावूनही आवश्यक रासायनिक खते, विशेषतः युरिया, डीएपी, आणि कंपाउंड खत मिळवण्यात अपयश येत असल्याचे सांगितले जात आहे काही शेतकऱ्यांनी खते खाजगी बाजारातून उच्च दराने खरेदी केल्याची कबुली दिली आहे. “सरकारने वेळेवर खते पुरवठा न केल्यास पेरणीस विलंब होईल आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होईल,” असे मत स्थानिक अल्पभूधारक शेतकरी अंनता भडके व त्यांच्या पत्नी वैशाली भडके यांनी व्यक्त केली आहे, व मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे तातडीने निवेदन दिले असून हा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नाही, खत टंचाईची ही समस्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर आहे विशेषतः पेरणीच्या किंवा वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वाहेगाव येथील परिस्थितीबद्दलची बातमी सदृश् मांडणी केली आहे,
गंगापूर प्रतिनिधी
अमोल पारखे
