फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर पो.स्टे.आवारात एक म्हातारी चिंताग्रस्त दिसताच ठाणेदार किशोर शेळके यांनी जवळ जावुन विचारपुस करुन दिलासा देत मदत केल्याने वृध्देच्या चेहर्‍यावर आनंद पसरुन खाकीतील पोलिसातही माणूसकी आणी संवेदना असल्याचे सर्वञ कौतुक होत आहे.


पोलिसांबाबत नागरिकांच्या मनात विविध भावना असतात. पोलीस नेहमी अंगावर वर्दी असल्यावर नागरिकांवर आवाज वाढवून बोलत असतात असे अनेकांचे विचार आहे. मात्र, खाकी वर्दीतही माणुसकी दडलेली असते याचे अनेक उदाहरणे अनुभवायला मिळत असतात.असेच एक मुर्तीमंत ऊदाहरण मंगरुळपीर तालुक्यातील पो.स्टे.मध्ये घडले.तालुक्यातीलच पोटी गावची एक वृध्द म्हातारी पो.स्टे.परिसरात चिंताग्रस्त अवस्थेत ठाणेदार किशोर शेळके यांच्या दृष्टीस पडताच त्या म्हातारीजवळ जावुन ठाणेदार यांनी आस्थेने विचारपुस दिलासा दिला.ती वृध्द म्हातारी तक्रार घेवुन आली होती पण दखल घेतल्या गेली नसल्याचे तिने सांगीतले,ऊसणवार पैसे घेवुन मदतीसाठी पो.स्टे.ला आल्याचे कळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी पोलिसांना त्या वृध्देच्या मदतीसाठी आवश्यक त्या सुचना देवुन टिकिटासाठी व सहकार्य म्हणून पैशाचीही मदत केली.खाकीतही एक देवमाणूस असतो जे लोकांच्या भावना आणी सदैव जनमाणसासाठी तत्पर असल्याचे हे एक ऊत्तम ऊदाहरण दिसले.सदर म्हातारी तोंडभरुन ठाणेदाराचे कौतुक करुन आशीर्वाद देत आनंदाने मार्गस्थ झाली.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *