गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे
मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे २७ सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली असुन
या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील ६५ किलो वजन गटात इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील अमर पाटेकर तर ७१ किलो वजन गटात साई पुंड यांनी उत्तम कामगिरी करीत विजेतेपद मिळवले. या विजयासह दोन्ही खेळाडूंनी जिल्हा स्तरासाठी पात्रता मिळवली आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजय कुस्तीपटूंचे शाळेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शक म्हणून क्रीडा विभाग प्रमुख श्री. पी. डी. त्रिभुवन व श्री. ए. के. दुशिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बाबासाहेब पारखे विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. बी. बनसोडे, उपप्राचार्य श्री. एस. यू. निकम व पर्यवेक्षक श्री. ए. एम. थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघ व्यवस्थापक श्री ए एच धनाड सर यांनी काम पाहिले.
