हवामानातील बदलांमुळे थंडीमुळे केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी, मध्य-पूर्व देशांकडून मागणी असल्याने निर्यात सुरू आहे, २०२५ मध्ये केळी भारताची सर्वाधिक निर्यात होणारी फळ ठरली आहे,ज्यामध्ये इराक, ओमान,इराण,यूएई यांसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे.अकोला जिल्हातील बाळापूर तालुक्यातील मौजे तामसी मधील शेतकऱ्यांनी नुकतीच व्हिएतनामला १५ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे.


उच्च दर्जाच्या केळींचा १५० टनचा पहिला कंटेनर व्हिएतनाम या देशामध्ये पहिली मोठी निर्यात केली आहे.तामसीच्या शेतातून आखाती देशात थेट केळी पोहोचणार आहे.यामुळे तामशीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याने बाळापुर तालूक्यातील केळी बागायतदारांमध्ये उत्साह वाढला आहे.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय केळीला चांगली मागणी आहे, श्रमाची जोड देत तामसी येथील युवा शेतकरी मिथुनकाळे,अमोल काळे,गजानन ढोरे यांनी केवळ पंधरा एकरातील केळीची पहिली कटण करून १५० टनाची अत्यंत दर्जेदार असलेली या केळींची तपासणी करून साई राम एक्सपोर्ट व इम्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून थेट व्हिएतनाम देशात निर्यात (एक्सपोर्ट) निर्यात झाली आहे.यामुळे तामसीसह संपूर्ण बाळापूर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील पहिल्यांदाच अशा प्रकारची केळी लागवड व यशस्वी निर्यात झाली आहे.यासाठी कृषी विभागाच्या (आत्मा) यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट 2.0 अंतर्गत तामशी येथे केळी पिकाची शेतीशाळा आयोजीत करण्यात आली होती याशेतीशाळेला कृषी विज्ञान केंद्र अकोला,डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञामार्फत निर्यातीकरिता दर्जेदार उत्पादन निघावे यासाठी लागवड तंत्र,जैविक संसाधनाचा वापर,ठिबक सिंचनद्वारे पाणी व्यवस्थापन कीड व रोगाची सुरुवातीपासून देखभाल, अन्नद्रव्य स्थापन,आवश्यक असणारे फ्रूट केअर आणि स्कटिंग बॅगचा अवलंब आणि ८ बाय ५ फुटावर केलेली लागवडीचा फायदा झाल्याचा मिथुन काळे,गजानन ढोरे, अमोल काळे यांनी सांगितले.त्याचेच फलित म्हणून व्हिएतनाम या देशात होणारी निर्यात आहे.निर्यातक्षम केळी पिकविण्याकरीता प्रकल्प संचालक (आत्मा)डॉ मुरलीधर इंगळे,प्रकल्प व संचालक डॉ प्रेमसिंग मारग,तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे,कृषी कृषी विज्ञान केंद्राचे गजानन तुपकर,डॉ गजानन लांडे,आत्मा यंत्रणाचे व्ही एम शेगोकार यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभल्यामुळे चांगले उत्पन्न घेतले.त्याचा फायदा त्यांना विक्रीमध्ये होताना पहायला मिळत आहे.केळी कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी १५० टनाचा केळी कंटेनर पाठविण्यात आला.या कंटेनरचे पूजन प्रकल्प उपसंचालक (आत्मा) प्रेमसिंग मारग,डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ गजानन लांडे,आत्मा यंत्रणाचे व्ही एम शेगोकार,मंडळ कृषी अधिकारी रामेश्वर मोरे,सहा कृषी अधिकारी ऋषिकेश गव्हाळे, पाणलोट सचिव सुधाकर केणेकर यांच्या हस्ते गणेश पूजन,फीत कापून करण्यात आले व तो कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी सोडण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *