२१ डिसेंबर पासुन कल्याण ते विधानभवन मुंबई पायी पेन्शनमार्च चे आयोजन
वाशिम:-दिनांक १ नोंव्हेंबर २००५ नंतर शासकिय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक २१ डिसेंबर पासुन ‘पडघा कल्याण’ येथुन पेन्शन संघर्ष समन्वय समिती च्या वतीने पायी पेन्शनमार्च चे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २१ डिसेंबर पासुन सुरू झालेला पेन्शनमार्च दिनांक २४ डिसेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे पोहचणार असुन पुढे दिनांक २५ डिसेंबर पासुन विधानभवनार ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बालाजी मोटे यांनी दिली. तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व विभागाचे सर्व डीसीपीएस एनपीएस धारक कर्मचारी मोठ्या संख्येने या पेन्शन मार्च ला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष निलेश कानडे यांनी सांगितले.

पेन्शनमार्चमध्ये वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त डीसीपीएस एनपीएस धारकांनी उपस्थित राहुन पेन्शनमार्च यशस्वी करावा असे आवाहन विनोद काळबांडे ,गोपाल लोखंडे,अनिल मडके,निलेश कानडे, श्रीकांत बोरचाटे,रवि ठाकरे,हरिदास मते,निलेश मिसाळ,रामप्रसाद धनुडे,गजु ढोबळे,संदिप महाले, बालाजी फताटे,निलेश म्हतारमारे,सचिन सवडतकर,श्रीपाद शिंदे,कैलास वानखेडे,अमोल बोडखे,गणेश इंगोले यांनी केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206