वाशिम :- मंगरुळपीर नगरपरिषद हद्दीमध्ये असलेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक(बायपास रोड) रस्त्याचे काम करण्याला कित्येक दिवसानंतर मुहुर्त जरुर मीळाले परंतु नुसताच तो रस्ता ऊकरुन ठेवून ये जा करणारांना यामुळे नाहक सामना करावा लागत असल्याने नागरीकांचा रोष वाढत आहे.वरिष्ठांनी लक्ष देवून त्वरीत या रोडचे काम पुर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.

शहरातील मुख्य समजला जाणारा डाॅ.आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता आहे.या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने नागरीकांना तसेच वाहनधारकांना मोठा ञास सहन करावा लागत होता.अखेर न.प.ला मुहुर्त सापडले आणी या रस्त्याचे मान्यवरांनी भुमीपुजनही मोठा गाजावाजा करुन केले.या रोडच्या आजुबाजुचे अतीक्रमण काढण्याच्या सुचना देवून हा रोड बांधन्यासाठी ऊकरला खरी पण हा ऊकरुन ठेवलेला रोड माञ कित्येक दिवसापासुन तसाच आहे.याच रोडवर ग्रामिण रूग्नालय आहे.या रूग्नालयात अतिदक्षता विभागात अनेक रुग्न राञीबेराञी ऊपचारासाठी येतात परंतु रस्ता ऊकरुन ठेवलेला असल्याने आणी मोठमोठे दगड रोडवर वाहनाखाली येत असल्याने मोठा ञास होत आहे.गरोदर माताही या रूग्नालयात तपासणी व ऊपचारासाठी येत असतात त्यांनाही ञास होवून अनूचित प्रकार होण्याची संभावना नाकारता येत नाही.हा रस्ता मुख्य असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते या वाहनचालकांनाही ये जा करतांना ञास होत असुन किरकोळ अपघातही झालेले आहेत.हा रोड निकृष्ठ दर्जाचा सुरु असुन तिथलेच खोदलेले मातीमुरुम जागेवरच टाकत असल्याचे सबंधित रोडविषयी विविध व्हाट्सअप गृपलाही काहींनी तक्रारी केल्याचे समजते.सबंधित ठेकेदारांना सुचना देवून नियमानुसार व इष्टीमेटनुसार या रोडचे काम त्वरीत करावे व नागरीकांना होत असलेला ञास वाचवावा अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206