सातेफळ येथील शेतकऱ्याच्या सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान

काल रात्री च्या सुमारास वसमत तालुक्यासह परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. उभी पिके, फळबागा आणि शेतीसाठी उभारण्यात आलेल्या सोलार यंत्रणांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे.

वसमत तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी ज्ञानदेव कीशनराव अंभोरे यांच्या शेतातील सोलार पंपाची यंत्रणा वादळी वाऱ्यामुळे गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली.

सोलार पॅनल, स्टँड आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक आणि शेतीसाठी उभारलेली सोलार यंत्रणा काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली 98 50 56 18 50

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *