सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे भरदिवसा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. बाजारपेठेतील शरद पाटील यांच्या घराजवळील बागेत बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नागरिकांना दूर जाण्याच्या सूचना दिल्या जात असतानाच बिबट्याने सरपंच तानाजी नाटूलकर यांच्या दिशेने अचानक धाव घेतली. उपस्थितांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पुन्हा झाडीत जाऊन लपला.

दरम्यान, वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला; मात्र झुडपांमध्ये लपल्याने तो दिसून आला नाही.

अखेर रेस्क्यू टीम बागेत दाखल होताच बिबट्या उंच झाडावर चढला आणि बागेच्या बाहेर उडी मारत डोंगराच्या दिशेने पसार झाला.

गेल्या महिनाभरापासून नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *