यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी अशोक विक्रम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

अशोक विक्रम पाटील (वय ६५) यांचे गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी भुसावळ येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्रीराम नगरमधून काढण्यात आली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. हरिभक्त परायण भैया महाराज ऊर्फ प्रथमचंद्र पाटील आणि अतुल पाटील यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *