वाशिम:- मंगरुळपीर तालुक्यातील दाभा जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेश कनिराम राठोड यांना अमरावती विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे.

याबाबत कोळंबी येथील दिलीप मोहनावाले यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांचेकडे सदर प्रकरण दाखल केले होते. यावर निकाल देतांना आयुक्तांनी राठोड यांना अपात्र घोषीत केले आहे. राठोड यांनी निवडणुक आवेदनपञ भरतांना चुकीची माहीती दर्शवली होती.ठेकेदार असुन अर्जामध्ये नमुद केले नव्हते. सत्य माहीती दडवुन चुकीची माहीती सदर अर्जात नमुद केल्याचे दिसून येत असल्याने त्यांना जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्यात येत असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *