पुणे : राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा गावाचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा गावाचे भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चचे सरचिटणीस पदी निवड झाली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा समितीच्या प्रमुख सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बावडा गावातील अब्दुल गणी अजित शेख यांना अल्पसंख्याक मोर्चाचे निवडीचे पत्र दिलेले आहे, आणि त्यांचा सत्कार केला आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा दिलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार बावडा गावचे सरपंच किरण पाटील, पवन घोगरे, तसेच कुबेर पवार, सचिन सावंत आदी मान्यवर, पदाधिकारी या सत्कार वेळी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील अल्पसंख्याक समाज यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना, सुविधा प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांनी म्हटले आहे. एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर, पुणे.