पुणे : आपल्या गुरूजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतील १९९० मध्ये इयत्ता दहावीत, १९९२ मध्ये इयत्ता बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. बँड व तुतारीच्या गजरात फेटे बांधून ,पंचारतीने औक्षण करून ७० ते ८९ वयोगटातील गुरूजनांचे प्रारंभी स्वागत करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थी यांची ३२ वर्षानंतर भेट झाल्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने शिक्षका़चे डोळे पाणावले.माजी मुख्याध्यापक तु.म.परदेशी, प्रा.घ.वा.करंदीकर तसेच माजी शिक्षकांची यावेळी भाषणे झाली.दिवंगत गुरूजनवर्ग व काळाच्या पडद्याआड गेलेले काही सवंगडी यांना या कार्यक्रमात श्रद्धांजलीही वाहण्यात आली.शितल वाघ या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष खाबिया व रविन बोरा यांनी केले.
अर्चना तिवाटणे, शितल वाघ, नीता बोरा, सीमा रूणवाल, विशाखा गायकवाड, निर्मला आढाव, स्वाती धाडीवाल, योगिनी तांबोळी, संतोष खाबिया, अविनाश ससाणे, शकीलखान, प्रशांत शिंदे, मनोज दीक्षित, सुनिल इंदलकर, निलेश खाबिया, गोकुळ रूणवाल, महेश सारडा, रविन बोरा, लहू गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्विततेसाठी विशेष प्रयत्न करून परिश्रम घेतले.
योगिनी तांबोळी या विद्यार्थिनीने आभार मानले.
