लहान मुलांंनी दत्तामामांना चॉकलेट देत केले अनोखे स्वागत!!

पुणे : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अगदी ग्राऊंड लेव्हलला जात शेवटच्या घटकात मिसळून काम करणारे नेते म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहेत. त्यांच्याकडे काल परवा पर्यंत  राज्यमंत्री तसेच सोलापूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असूनही सत्तेची हाव‌ डोक्यात जाऊ दिली नाही.

    त्यांनी कधीही अंगरक्षक अथवा सुरक्षा यंत्रणा  सोबत न ठेवता जनमाणसांत सहज वावरत असत. त्यांचा हाच साधेपणा संबंध महाराष्ट्राने अनुभवला आहे, तालुक्यात सुध्दा फिरत श्री.भरणे हे कोणताही बडेजावपणा न करता सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून वावरत असतात.त्यांच्या सुखा- दु:खात ते नेहमीच धावून जातात.

    त्याच बरोबर लहान मुलांच्यामध्ये तर दत्तामामा अगदी दिलखुलासपणे रमुण जातात हे अनेकदा दिसले आहे.त्याचाच प्रत्यय आज निमगाव केतकी  आला. त्याचे झाले असे की,श्री.दत्तात्रय भरणे हे या ठिकाणी भेटीनिमित्त गेले असता,त्यांचा ताफा थांबताच शुभरा अमोल दोशी व अथर्व अमोल दोशी ही मुले धावत मामांकडे आली व त्यांनी हातातील चॉकलेट मामांना देत अनोख्या पद्धतीने स्वागत केले.यावेळी लहान मुलांकडून अशा अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने श्री.भरणे ही अतिशय भारावून गेले होते.

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *