वाशिम : कारंजा येथील चंदेल नगर, मधील जमीनदोस्त खुल्या विहिरीत अल्पवयीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दि.२ नोहेम्बर च्या सकाळी घडल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे ? सध्या बालकाचा विहिरीत सकाळ पासून शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच पाणी जास्त असल्यामुळे 4 पंपाच्या साह्याने पाणी उपसण्याचा काम सुरू आहे मात्र पाणी जास्त असल्यामुळे पाण्याचा उपसा करणे कठीण जात आहे त्यामुळे आणखी दोन पंप लावण्यात आले आहे.

सध्या सहा पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये शहरातील बचाव पथक सह गाडगेबाबा बचाव पथक चे कार्यकर्ते कार्य करीत आहे रात्री दहा वाजेपर्यंत बाच बालकाचा शोध लावण्यात आला नव्हता यावेळी तहसीलदार धीरज मांजरे आपल्या कर्मचाऱ्यांचा हजर होते तसेच हाजी मो. युसूफ पुंजानी हे सुद्धा सकाळपासून घटनास्थळी हजर आहे. या ठिकाणी लोकांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रहिवासी क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या खुली विहीर ठेवणे अत्यंत धोकादायक असताना संबंधित मालकाने प्लॉट विक्री करून निष्काळजीपणा केला आहे. या घटनेमुळे संबंधित ले- आऊट मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आह
- फुलचंद भगत