पुणे :-
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर एम धारिवाल विद्यानिकेतन प्रशाला माध्यमिक,उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्राचार्य,मुख्याध्यापकपदी प्रा.संजयकुमार पंडीतराव गजऋषी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मुख्याध्यापक पांडुरंग दौंडकर सेवानिवृत्त झाल्याने प्राचार्य,मुख्याध्यापक पदावर प्रा.संजयकुमार गजऋषी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

विद्यालयात गुरूपौर्णिमा,क्रांतीदिन ,जागतिक आदिवासी दिन ,गणेशोत्सव, शिक्षकदिन,महात्मा गांधी जयंती ,पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती असे कार्यक्रम साजरे केले जात असून भित्तीपत्रके स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वच्छता जनजागृती, विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते असे प्राचार्य,मुख्याध्यापक संजयकुमार गजऋषी यांनी सांगितले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628