बाभुळगाव ग्रंथपाल परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला असून यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या बाभुळगाव येथील रहिवाशी कुमारी बुशरानाज आरिफ अली हिने महाराष्ट्रातून ग्रंथपाल परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बाभूळगाव येथे आयोजित यवतमाळ जिल्हा ग्रंथालयाच्या 40 व्या अधिवेशना प्रसंगी कुमारी बुशरानाज आरिफ अली हिने ग्रंथपाल परीक्षेत महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक पटकावल्याने हिचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, अमरावती विभागीय अध्यक्ष शामराव वाहूरवाघ, उच्च न्यायालयाचे वकील निखिल सायरे, कार्यवाहक श्रीरामजी देशपांडे, अरविंद ढोणे, राजेंद्र कोरे, प्रशांत पंचभाई, अजय शिरसाट, पद्माकर राऊत, आनंद आडे, प्रल्हाद इंगळे, रामजी राऊत व मोठ्या संख्येने वार्षिक अधिवेशनाकरिता जिल्ह्यातून आलेले शासनमान्य अनुदानित ग्रंथालयाचे प्रतिनिधी हजर होते.
प्रतिनिधी:-सरफराज पठाण
Ntv न्युज मराठी-बाभूळगाव