शासनमान्य , महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 या संघटनेच्यावतीने जागतिक अपंग दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळा, दिनांक ५ डिसेंबर रोजी भाग्यलक्ष्मी सभागृहात अलिबाग येथे पार पडली. कार्यशाळेचे उदघाटन ,आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानआमदार भरतशेठ गोगावले यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री , दिपकजी केसरकर यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी दिव्यांग कर्मचारी यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या संदर्भात बोलताना सांगितले की, दिव्यांगाबाबत शासन संवेदनशीलअसून त्यांच्या सर्वंकष विकासासाठी व पुर्नवसनासाठी कटीबद्धआहे. दिव्यांग शिक्षक बदली कायदयामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन सर्वच प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकात्यांना दिले. शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि दिव्यांगांचे स्वतंत्र विभाग स्थापन केलेचीही नमूद केले. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी संघटनेस रु.५१०००/-(एक्कावन हजार रुपये) आर्थिक मदत दिली.दिव्यांग सेवा हीच ईश्वरसेवा आहे हे मानून आपण दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहणार कसलेचे गोगवले यांनी सांगितले. संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे काही मागण्या शासनदाबारी मांडण्यात आल्या.यामध्ये अपंग वाहन भत्ता दुप्पट दराने लागू करावा, अपंगांच्या सरळ सेवा आणि पदोन्नतीमध्ये ४ टक्के प्रमाणे अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगाचे मानधन ५००० हजार रुपये करावे, दिव्यांगासाठी ५ टक्के राखीव निधी ठेवावा, दिव्यांग कर्मचारी यांची मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, दिव्यांग कर्मचाऱ्यांची आगाऊ वेतन वाढ मंजूर करावी, अशा विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करून त्या पूर्ण करण्यात येतील , असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले . या कार्यक्रमासाठी अलिबाग न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यकार्यकारी अधिकारी , आदरणीय किरण पाटील साहेब, राज्य संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील ,अध्यक्ष, रविंद्र पाटील ,साईनाथ पवार सर , सचिव परमेश्वर बाबर साहेब, ललित सोनवणे, वकील अग्रवाल साहेब ,आर. टी. सैंदाणे, भास्कर कुवर, धुळे जिल्हाध्यक्षा – चंद्रकला परदेशी, जयश्री देवरे, सुरेखा देवरे, राजश्री मेश्राम, चञू पवार, संदीप बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते . अशी माहिती कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष , रावसाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलीआहे.