उमरखेड :
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने शैलेश ताजवे यांना येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे उत्कृष्ट लेखन पत्रकारिता सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ विजयराव माने होते तर उद्घाटक म्हणून श्रीकांत देशमुख माजी अप्पर आयुक्त तथा साखर संचालक महाराष्ट्र राज्य हे होते यावेळी ताजवे यांच्यासह बारा व्यक्तींना सामाजिक व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी मंचावर उपस्थित भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा ,नितीन माहेश्वरी, डॉ वि ना कदम, डॉ अजय नरवाडे ,रवी शिलार, किशोर ठाकूर, रितिक वानखेडे, देवानंद मोरे, क्षीरसागर उपस्थित होते .
दरवर्षी सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्ती तथा सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो .ताजवे यांना उत्कृष्ट लेखन व पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तथा सर्व स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे .