सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या प्रयत्नांना यश…
आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे मागणी केली व त्यांनी तात्काळ रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून दिली.खर्डा येथे दिनांक 17 जानेवारी रोजी सिताराम गडाचे महंत महालिंग महाराज नगरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या सततच्या पाठपुराला यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार या खर्डा येथे सांत्वन भेटीसाठी आल्या आणि त्यांनी दुःखद कुटुंबांना भेटी दिल्या असता त्यावेळी अनेक रुग्ण हे उपचार व वेळेअभावी चांगल्या दवाखान्यात जाण्या अगोदरच मृत पावले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या ठिकाणी आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पत्रकार दत्तराज पवार यांच्याशी चर्चा केली असता सर्वात जवळचा सोयीचा दवाखाना कुठे उपलब्ध होईल अशी विचारणा केली असता बार्शी हे रुग्णांच्या उपचारासाठी सर्वात जवळचे ठिकाण असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर सुनंदाताई पवार यांनी बार्शी येथील तीन हॉस्पिटल बरोबर चर्चा करून खर्डा व परिसरातील रुग्णांना वेळेत व कमी खर्चात उपचार करण्यासाठी तेथील डॉक्टरांना विनंती केली व ती विनंती तेथील तज्ञ डॉक्टरांनी मान्य केली.
त्यामुळे यापुढील काळात या भागातील रुग्णांना कमी खर्चात व वेळेत उपचार मिळणार आहेत. यासंदर्भात पत्रकार दत्तराज पवार यांनी येथील रुग्णांना बार्शी व इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) ची गरज असल्याचे सुनंदाताई पवारांच्या ही बाब लक्षात आणून दिली व सातत्याने पाठपुरावा करून याबाबत त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेबाबत आमदार रोहितदादा पवार यांना खर्डा भागासाठी ॲम्बुलन्सची गरज असल्याचे सांगितले व ती तातडीने देण्या संदर्भात चर्चा केली, त्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जत,जामखेड एकात्मिक संस्थेच्या माध्यमातून खर्डा येथे तात्काळ नवी कोरी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) सिताराम गडाच्या मंदिर समितीकडे सुपूर्त केली, त्याचे उद्घाटन गडाचे महंत ह..भ.प. महालिंग महाराज नगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अशा प्रकारे आमदार रोहितदादा पवार यांनी गरजू रुग्णांना रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध केली असल्याने सर्वसामान्य जनतेतून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी खर्डा व परिसरातील भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी