जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी
महाराष्ट्र शासन आणी राज्य मागासवर्ग आयोग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मराठा आरक्षण बाबत सर्वे करण्यासाठी वेळापत्रक दिले असून हा सर्वे विहित मुदतीत करणेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मा.राज्य मागासवर्ग आयोग यांनी दिनांक 17/1/2024 रोजी काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 20/1/2024 रोजी तालुकास्तरीय प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.तालुकास्तरीय प्रशिक्षक यांनी तालुक्याला दिनांक 21 आणी 22 /1/2024 रोजी या सर्वे साठी नेमलेले सर्व प्रगणक आणी पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण द्यायचे आहे.
त्यानुसार जामखेड तालुक्यामध्ये वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन 177719 लोकसंख्या आणी 35523 कुटुंबांचा सर्वे केला जाणार आहे.या सर्वे साठी गोखले इन्स्टिटयूट पुणे यांनी विकसित केलेले अँप MSBCC हे सर्वे करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रत्येक गावात सर्वे करण्यासाठी नेमलेले प्रगणक आणी पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक 22/1/2024 रोजी आयोजित केलेले आहे.
या सर्वे साठी जामखेड तालुक्यात एकूण 402 प्रगणक आणी 41 पर्यवेक्षक असे एकूण 443 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यामध्ये शिक्षक,तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,रोजगार सेवक,कोतवाल,पोलीस पाटील,ग्रामपंचाय कर्मचारी यांची मदत घेतलेली आहे.प्रत्येक 100 कुटुंबामागे एक प्रगणक आणी प्रत्येक 15 प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक अशी नेमणूक केलेली आहे. या सर्वेसाठी प्रगणक आणी पर्यवेक्षक यांना मानधन देण्यात येणार आहे. सदर सर्वे हा दिनांक 23/1/2024 ते 31/1/2024 पर्यंत पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करायचा आहे. या सर्वे मध्ये खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची मूलभूत माहिती,आर्थिक स्थिती, समाजिक माहिती,आरोग्य विषयक माहिती,कुटुंबातील सर्व सदस्य यांची शैक्षणिक आणी आर्थिक माहिती या बाबीवर आधारित प्रश्नावली असून त्यानुसार कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार,गट विकास अधिकारी,मुख्याधिकारी नगरपरिषद,नायब तहसीलदार यांची तालुका स्तरावर माहिती जमा करून शासनाला सादर करणेसाठी नेमणूक केलेली आहे. यामध्ये गावातील सर्वच कुटुंबांचा सर्वे होणार आहे. त्यामुळे सर्व जामखेड मधील लोकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या तालुक्यात दिनांक 23/1/2024 पासून हा सर्वे चालू होणार आहे .आपण आपल्याकडे माहिती घेण्यासाठी जे प्रगणक येतील त्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे त्यामुळे विहित वेळेत हा सर्वे पूर्ण होऊन शासनाला माहिती देणे सोपे होईल.
तहसीलदार जामखेड