पुन्हा एकदा जामखेडचे नाव देशपातळीवर चमकणार
75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त नागेश विद्यालयाचा विश्वविक्रम उपक्रम पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये 32000 स्क्वेअर फुट मध्ये गोलाकार रचनेत भारताचा नकाशा व त्यामध्ये जय हिंद – जय भारत नाव आहे तसेच 75 वा प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवाची सुरुवात होत असल्याने 75 मीटर तिरंगा फडकवत विद्यार्थी रचनेतील अक्षर चित्र तयार होणार आहे. हे चित्र कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयुर कृष्णाजी भोसले हे साकारणार आहे.
यामध्ये श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील 2500 विद्यार्थी एनसीसी कॅडेट शिक्षक ग्रामस्थ आजी माजी सैनिक हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत.
तसेच 17 महाराष्ट्र बटालियनचे श्री नागेश विद्यालय एनसीसी युनिट उत्कृष्ट संचलन सादर करणार आहे.
हे चित्र आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रेरणातुन व संकल्पनेतून स्थानिक स्कूल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येणार आहे.त्या मुळे पुन्हा एकदा चमकनार जामखेडचे नाव देशपातळीवर अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांनी दिली तसेच 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण होणार आहे. 7.30 ते 9 .30 या वेळेत हे पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
75 वा प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव निमित्त भव्य मानवी रचनेतील विद्यार्थ्यांपासून बनवलेले कलाकृती पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे