इफ्तार पार्टीत केले प्रतिपादन
उमरखेड :-रोजाचा उद्देश ईशपारायणता असून कोणी पाहो न पाहो माझा ईश्वर मला पाहत आहे ही भावना वृद्धिगत करणे हा आहे . एक महिन्याचे प्रशिक्षण उर्वरित अकरा महिने त्यावर चालण्याची प्रेरणा देतो . हा हदय परिवर्तन चा महीना असून स्वयः मध्ये परिवर्तन , कुटुंबात परिवर्तन मग समाजात व राष्ट्रात परिर्वतन हेच ह्या प्रशिक्षणाचा उदेश असल्याचे मत जमाते इस्लामी हिंदचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नईम शेख यांनी मांडले ते स्थानिक अनंतराव देवसरकर सभागृहात जमात तर्फे घेण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत बोलत होते .
रमजान महिन्यात कुरआन चे अवतरण झाले कुरआण संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शन आहे आणि सत्य व सत्याचा फरक स्पष्ट करणारी कसोटी असून पूर्णपणे सुरक्षित अंतिम इशग्रंथ आहे . जिवंत भाषेतील ग्रंथ असून सर्वकालीन आव्हान करणारा ग्रंथ असल्याचेही शेख म्हणाले .
मानवी समानता एकेश्वरतत्त्व , प्रेषित तत्व ,मरणोत्तर जीवन या कुरआनच्या मूलभूत शिकवणी असल्याचेही शेख म्हणाले
ते पुढे म्हणाले की ,मनुष्य जीवनाचा उद्देश नुसता चंगळवाद नसून ईश्वराने मनुष्याला सदसद विवेक बुद्धी देऊन तुझी निर्मिती कशासाठी करण्यात आली . खरं खोटं वाईट चांगलं याचा विचार मनुष्याने करणे गरजेचे असल्याचे सांगून जमाते इस्लामी हिंद देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून समाजात जोडण्याचे प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले .
सुत्र संचलन फिरोज अत्सारी यांनी तर आभार प्रदर्शन खालीद इस्माईल यांनी केले