वीज पडून दोन बैल एक गाय व वासराचा मृत्यु हवालदिल शेतकरी शासनाच्या मदत

प्रतिक्षेत असुन त्वरीत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

जामखेड तालुक्यात काल दि 17 एप्रील रोजी झालेल्या जोरदार वादळ वाऱ्यासह विज कडकडाटाचा तालुक्यातील अनेक गावास याचा फटका बसला असून विविध ठिकाणी झालेल्या या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या पशुधनावर घाला घातला आहे त्यातच तालुक्यातील सटवाई जवळका या गावी वेग वेगळ्या दोन ठिकाणी एकाच वेळी वीज कोसळल्याने येथील शेतकरी अंकुश वाळुंजकर यांची एक गाय तर दुसरे शेतकरी बाबासाहेब पाडुरंग हाडोळे यांचा बैल अशा दोन जनावराचा जागीच मृत्यु झाला आहे

तर भुतवडा येथील उद्धव पाडुरंग डोके यांचे वासरु आणि बिभीषण रामचंद्र भोरे यांची एक दुभती गाय वीज पडल्याने मृत्यु पावली आहे अशी एकुन चार जनावरे एकाच दिवशी विजेच्या पडन्याने मयत झाली असल्याने सबंधीत शेतक ऱ्यावर आलेल्या या अस्मानी संकटाचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशीच सबधीत शेतकरी मागणी करत आहेत


तर या अस्मानी वादळ वारा व विजेच्या कडकडाटामुळे जामखेड तालुक्यातील एकुन चार जनावरे दगावली असून परिसरातील शेतकऱ्याचे इतर काही नुकसान हि झाले आहे त्यामुळे या नैसर्गीक आपत्तीची भीती सर्वत्र असून शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना धास्तावत आहे

प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अहमदनगर
मो न 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *