DHARASHIV | येरमाळा येथे रमजान ईद हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . दि .३१ रोजी रमजानचा पूर्ण महिना उपवास केल्यानंतर सर्व मुस्लीम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्रीत आले होते . येरमाळा येथील ईदगाह च्या ठिकाणी सकाळ पासुनच मुस्लीम बांधवांनी नमाजासाठी गर्दी केली होती . नमाज पठण केल्यानंतर अनेक हिंदु तरुणांनी सर्वधर्म समभाव ही भावना मनामध्ये ठेवून जात, धर्म यापलीकडे जाऊन माणुसकीला महत्व देत मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देऊन , गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या . तसेच मुस्लीम बांधवांनी देखील समाजामध्ये शांतता रहावी, सर्व धर्मांतील लोक आनंदाने, गुण्यागोविंदाने रहावेत यासाठी अल्लाकडे दुवा मागीतली .
येरमाळा प्रतिनिधी
सुधीर लोमटे