शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते तपोवन रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मार्गावर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे. गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौक येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ८ जून ते १८ जून या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दहा दिवस या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. छत्रपती संभाजी नगर महामार्गावर सुरभी हॉस्पिटल ते कलानगरकडे जाण्यासाठी गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांचे कार्यालय – हनुमान मंदिर रामकृष्ण कॉलनी – अष्टविनायक अपार्टमेंट समता नगर – झालानी हॉस्पिटल मार्गे गंगा उद्यान असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

N Tv News Marathi🎥📷
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896