BULDHANA | बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभा येथील एका नागरिकाची जागेची नोंद ग्रामपंचायत मध्ये घेऊन त्याचा आठ अ उतारा देण्यासंदर्भात ग्रामसेवक राजेंद्र वासकर यांनी 28 हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले, याप्रकरणी संबंधित नागरिकाने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाणा तहसील कार्यालय आवारात सापला रचला असता ग्रामसेवक राजेंद्र वासकर याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
