राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत विविध संघटनांचे पदाधिकारी नोंदविणार सहभाग
वाशीम- गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने वाशिम येथे होत असलेल्या आगामी साहित्य संमेलन संदर्भात नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन दि. १२ डिसेंबर रोज रविवारला नागपूर येथे करण्यात आली आहे.

या बैठकीचे अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजपालसिंह राठोड,दिल्ली प्रदेशाध्यक्ष जयपाल राठोड, हरियाणा प्रदेशाध्यक्ष अशोक भाटिया, राजस्थान प्रदेशाध्यक्ष, सुरेश बंजारा, गुजरात प्रदेशाध्यक्ष जिंतेद्र बंजारा, हिमाचलप्रदेश विशनसिंग राठोड, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, जाणिवा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र राठोड, गोर आर्मी संघटनेचे महासचिव होमसिंग पवार, संघाचे प्रवक्ते डाॅ. सिताराम राठोड राहणार आहेत. सदरील दीनबंधू सामाजिक संस्था जाफर नगर वॉटर रिंग रोड येथील बैठकीस भारतातील तामिळनाडू, केरळ, ओडिशा, जम्मू, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश सह वेगवेगळ्या आठरा प्रतिनिधी हजेरी लावणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाची तारीख सुद्धा घोषित करण्याची शक्यता आहे. अशी माहीती मिळाली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम मो.8459273206