प्रतिनिधी (नळदुर्ग )
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे पोलीस ठाणे नळदुर्ग च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून धाराशिव सह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विजयी मिरवणूक काढू नये.
जर आपले वर्तनाने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे नळदुर्ग पोलीस ठाणे