लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले महाराष्ट्रातील जंगम समाजाचे द्वितीय खासदार सन्माननीय डॉ.शिवाजीराव काळगे यांचा दिनांक 5 जून 2024 रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी शॉल, तुळजाभवानीची चांदिची मूर्ती, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करून भावी कालावधीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रफुल्लकुमार आण्णा शेटे वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष धाराशिव उस्मानाबाद तथा धाराशिव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना महाराष्ट्र सहसचिव, वीरशैव सभा संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन ( दादा ) वाले, संजय रेणुके, सधन शेतकरी भिमाशंकर यादगौडा, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख आदि उपस्थित होते.