जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे पुढे शिकून मोठे झाल्यावर आपणास काय बनायचे काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे त्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य पालकांनी दिले पाहिजे तसेच मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
जामखेड शहरातील व्हिजन अकॅडमी(कोचिंग क्लासेस) यांच्या वतीने आज रोजी शहरातील महावीर भवन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवंतांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे म्हणाले की, मुलांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. शहरात व्हिजन अॅकेडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली संधी प्राप्त झाली आहे.यावेळी त्यांनी” मी कसा घडलो व गरिब व प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी कसा झालो .याचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला.
शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, जामखेड तालुक्यात या व्हिजन अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माफक दरात संधी उपलब्ध करून दिली आहे .त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बीड चे नागनाथ शिंदे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, चंद्रकला खरपुडे, मल्हारी पारखे,एकनाथ चव्हाण, बाळासाहेब जरांडे,व्हिजन अॅकॅडमीचे प्राचार्य दत्तात्रय वैष्णव, प्राध्यापक श्रवण कुमार, प्राध्यापक संतोष कुमार, प्राध्यापक मुकेश यादव, प्राध्यापक उध्दव माहुदे, मार्केटिंग प्रमुख चव्हाण सर,माने सर, भगवान गिते सर आदी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय वैष्णव यांनी केले. सुत्रसंचलन शिवव्याख्याते प्राध्यापक जाकीर शेख यांनी केले.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124