एकेकाळी उत्पन्नात एक नंबर असणारे जामखेड चे एस् टी बस आगाराचे उत्पन्न खालावले गेले आहे याला एकमेव कारण म्हणजे खराब असणाऱ्या बस आहे या संदर्भात लवकरच प्रवासी संघटना आचारसंहिता उठल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी वर्धापण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले
आज दिनांक एक जुन रोजी जामखेड बसस्थानक आवारात एसटी चा ७६वा वधाँपण दिन साजरा करण्यात आला यावेळी बसस्थानक परिसर व एसटी बसची सजावट करण्यात आला यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनिल शिंदे उपाध्यक्ष वसंतराव राळेभात सचिव सागर गुंदेचा संचालक तुकाराम अंदुरे मिठुलाल नवलाखा वाहन निरिक्षक शशी खटावकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव ढगे वाहतूक नियंत्रक अजित कोल्हे भाऊसाहेब लटपटे जयश्री साळवे लिपीक गणेश वराट चालक बाळासाहेब सारूक श्रीमंत मासाळ प्रवासी विठ्ठल आडागळे परशुराम रिठे रणजीत जाधव भारत निर्मळ.
चौकट
यावेळी जुन्या बसस्थानक समोर बस थांब्यावर अनाधिकृत टँक्टर अनेक दिवसांपासून उभा आहे त्यामुळे प्रवाशांना उभे राहता येत नाही त्यामुळे तो टँक्टर काढण्यात यावा अशा मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले आहे जर अनाधिकृत टँक्टर काढण्यात आला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा हि देण्यात आला आहे
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124