मान्सुनपूर्व अपूर्ण कामे जीर्ण विद्युत वाहिन्या अपुरे कर्मचारी जुनी यंत्र सामुग्री कर्मचारी अधिकारी यांचा बेजबाबदार पणा अथवा इतर अनेक कारणाने जामखेडची वीज नेहमी गुल होत असून दिवसे दिवस वीज पुरवठा खंडीत होत आसुन गेल्या पंधरा दिवसापासून विजेचा लपंडाव चालु आहे या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केले असता अधिकारी म्हणतात लाईट गेलेले आम्हाला माहीतच नाही तसेच बऱ्याचदा महावितरण कार्यालयातील मोबाईल बंद असतो कार्यालयातील कर्मचारी व्यवस्थित उत्तर देत नाहीत रात्रभर लाईट नसल्याने लोकांचे हाल होत आहेत याकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कडुन उपस्थित केला जात असुन त्वरीत वीज पुरवठा व्यवस्थीत करा अन्यथा सर्व नागरिक व वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र आदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर या संदर्भात शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता अमोल राजोळे यांनी कर्मचारी काम ऐकत नसल्याचे सांगत आपल्या कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला असून अधिकारी कर्मचारी याच्यात सुत पात नसल्याचे संकेत दिले आहेत तसेच
वाहिन्या दुरुस्ती रोहीत्राचे काम अथवा इतर कारणे सांगुन कर्मचारी अधिकारी संगण मताने दोन दोन दिवस वीज पुरवठा खंडीत ठेऊन सर्व सामान्य वीज ग्राहक व व्यावसायीक यांना त्रास देत नुकसान करत आहेत
यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे वेल्डिंग दुकानदार लाईटवर चालणारे सर्व दुकान सर्व व्यावसायिक यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे महत्त्वाचे म्हणजे जामखेडला वरिष्ठ अधिकारी चांगले असावेत अधिकाऱ्यांचे कर्मचारी ऐकत नाही असे उत्तर अधिकारी देतात आणि म्हणतात तुमच्या लाईनचा जो वायरमन असेल त्याला तुम्ही लाइट विषय विचारात जावा तसेच बीड रोड सरकारी दवाखाना रोहीत्राचा रोजच प्रॉब्लेम होत आहे रोहीत्रावर लाईट चालू असते परंतु वीज मंडळाच्या ऑफिसमध्ये पार्किंग होते हे त्यांना अजून लक्षात येत नाही अशा बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागते
तसेच आईस्क्रीम दुकान केक दुकान यांचे लाईट नसल्यामुळे खूप नुकसान होत आहे तरी हा सर्व सावळा कारभार त्वरीत बंद न झाल्यास आपण नागरीव व वीज ग्राहक व्यवसायीक यांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कडून देण्यात आला आहे
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो न 9765886124