स्वतः 27 वेळा रक्तदान करून केला उच्चांक…
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा दुवा म्हणजे खर्डा या गावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दत्तराज पवार यांनी रक्तदान चळवळीला अनेक वर्षांपासून वाहून घेतले आहे. जवळजवळ त्यांनी 6500 रक्त बाटल्या बार्शी येथील श्रीराम भाई शहा रक्तपेढी,भगवंत ब्लड बँक बार्शी व नगर येथील ब्लड बँकेत रक्त बाटल्या जमा केल्या आहेत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी स्वतः आजपर्यंतच्या जीवनात 27 वेळा रक्तदान करून उच्चांक केला आहे, दत्तराज पवार म्हणजे रक्त व विश्वास या दोन्ही नात्यांचे गुंफण! त्यात रक्तदान म्हणजे ईश्वरीय कार्य हे कार्य ते गेली अनेक वर्षापासून अव्याहतपणे करीत आहेत,याबाबत त्यांचा या कार्याची दखल घेऊन सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब व पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
दत्तराज पवार यांनी आजपर्यंत अनेक गरीब व गरजू रुग्णांना अल्पदरात ब्लड बँकेतून रक्त बाटल्या दिल्या आहेत. त्यामुळे कोणालाही रक्त लागले तर पवार यांना रक्तासाठी फोन केला जातो तेही हे काम समाजासाठी आपण आपले कर्तव्य समजून उतराई व्हावी या प्रामाणिक हेतूतून सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. याबाबत त्यांना बार्शी येथील भगवंत ब्लड बँकेचे गणेश जगदाळे यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते.
गेल्या अनेक वर्षांपासून दत्तराज पवार यांनी थोर समाजसेवक, विविध जयंती उत्सव, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव व राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खर्डा येथे रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. त्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत सहा हजार पाचशे रक्त बाटल्या ब्लड बँकेत जमा केल्या आहेत, त्या माध्यमातून गरीब व गरजू दवाखान्यात ऍडमिट असलेल्या रुग्णांना अल्प दरात रक्त बाटल्या मिळवून दिल्या आहेत. तसेच त्यांनी स्वतः 27 वेळा रक्तदान करून उच्चांक केला आहे, रक्तदान ही एक चळवळ झाली पाहिजे व रक्तदान केल्याचे महत्व ही ते लोकांना पटवून देत आहेत त्यामुळे खर्डा व परिसरात रक्तदान शिबिराला तरुणांचा मोठा सहभाग वाढत चालला आहे.
त्याचबरोबर त्यांनी खर्डा व परिसराची रुग्णवाहिकेची गरज ओळखून आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांच्यामार्फत एक ॲम्बुलन्स गाडी खर्डा येथे मिळवून दिली आहे की जेणेकरून त्याचा उपयोग रुग्णांना अतिजलद सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. ती ॲम्बुलन्स गरीब गरजू लोकांना अल्प दरात मिळण्यासाठी श्री क्षेत्र सिताराम गड येथे ठेवण्यात आली आहे. त्याचाही उपयोग लोकांनी पेशंटला बाहेरगावी मोठ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी करावा असे ते म्हणाले.
आज जागतिक रक्तदान दिवस असून रक्ताची गरज कोणाला लागेल हे सांगता येत नाही, तरी पुढील रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे ते म्हणाले, तसेच यावेळी बोलताना दत्तराज पवार बोलताना एक शेर म्हणाले की, “धर्म और जाती का नशा उस वक्त उतर जाता है! जब किसी को अस्पताल मे खून की जरूरत पडती है!
तसेच आज जागतिक रक्तदाता दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पवार यांनी यावेळी दिल्या.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं 9765886124