अध्यक्षपदी अॅड.लक्ष्मण (आबा) बबन कचरे तर उपाध्यक्षपदी अॅड. सुरेश आबासाहेब लगड, कार्याध्यक्षपदी अॅड. शिवाजी राधाकृष्ण सांगळे व सचिव पदी अॅड. राजेश दत्तात्रय कावरे यांची एकमताने निवड.
कौटुंबिक न्यायालय अहमदनगर वकील संघाची नुकतीच प्रत्येक दोन वर्षांनी होणारी सभा यावर्षी पार पडली. सभेत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये नविन कार्यकारणी नियुक्त करण्यासंदर्भात अॅड. शिवाजी सांगळे यांनी सुचना मांडली. त्या अनुषंगाने अध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण (आबा) बबन कचरे तर उपाध्यक्षपदी अॅड. सुरेश आबासाहेब लगड यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच कार्याध्यक्ष पदी अॅड. शिवाजी राधाकृष्ण सांगळे, सचिव पदी अॅड. राजेश दत्तात्रय कावरे, सहसचिव अॅड. रोहिणी श्रीपाद उंडे / नगरकर, खजिनदार अॅड. बाबाजी दामोदर सांगळे यांचेसह सदस्यांची देखील पुढील दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली. सदस्यपदी अॅड. शिवाजी आण्णा कराळे, अॅड. उमेश रंगनाथ नगरकर, अॅड. मच्छिंद्र बाबुराव आंबेकर, अॅड. कल्याण कचरु पागर, अॅड. अनिता विश्वनाथ दिघे, अॅड. पोपट ज्ञानदेव म्हस्के व अॅड. प्रणाली विनोदराव भुयार यांची निवड करण्यात आली.