दाळिंब ग्रामस्थांनी आ.ज्ञानराज चौगुलेंचा केला भव्य सत्कार.
(सचिन बिद्री:उमरगा)
मौजे.दाळींब येथे विशेषतः मागील 02 वर्षाच्या कालखंडात विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भरघोस असा निधी मंजूर केला. त्याबद्दल ग्रामपंचायत दाळिंब व बाबा जाफरी सोशल फाउंडेशनच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कारास उत्तर देताना आमदार चौगुले यांनी नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे आद्यकर्तव्य असून यासाठी निधी उपलब्ध करून देणे व त्याच्या माध्यमातून विविध विकास कामे करणे ही अविरत चालणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाल्याने मला प्रत्येक गावातील वेगवेगळ्या जाती धर्मांच्या उद्धारासाठी व मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी भरघोस असा निधी मंजूर करून घेता आला असे यावेळी म्हणाले.
दरम्यान गावातील अनेक नागरिकांनी केलेल्या विकास कामांबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार केला व आभार व्यक्त करत पुढील काळात आमदार चौगुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.तसेच शाळेची इमारत बांधणे, कब्रस्थान सरंक्षक भिंतच्या उर्वरीत कामांसाठी निधी मिळणे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज मंदिर बांधणे, बौद्ध विहार बांधणे, शेतरस्ते करणे,नविन व अतिरीक्त रोहित्र बसविणे,मातंग समाज स्मशानभूमी करणे, धनगर समाज मंदिर बांधणे, दिव्यांग बांधवांना घरकुलाचा लाभ मिळवुन देणे अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शेतकरीसेना तालुकाप्रमुख शाहूराज सावंत, सरपंच रंजनाताई सातपुते, पोलीस पाटील अश्विनीताई वाले, साहेबलाल(चाचा) कमाल, बाबुराव टिकंबरे, एकबाल पटेल, खय्युम चाकुरे, नदीम मुगळे, हनुमंत शिंदे, धीरज इंगळे, राजू कारभारी, प्रदीप मदने, अमर देशटवार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.