तलाठ्याकडुन चौकशी अहवाल सादर,कारवाईकडे सर्वांचे लक्ष

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लासच्या जागेतुन ग्रा.पं.च्या कामासाठी अवैधपणे ऊत्खनन झाल्याची बाब समोर आली असुन यासंदर्भात चौकशी अहवाल सबंधित तलाठ्याने मंगरुळपीर तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे.
मंगरूळपीर तालुक्यात गौणखनिजांचे अवैध ऊत्खनन ही बाब नवी नाही.याआधीही अवैध गौण खनिज ऊत्खनन आणी वाहतूकीसंदर्भात महसुल प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडुन अनेक कारवाया झाल्या आहेत.परंतु खुद्द ग्रामपंचायतकडुनच ई क्लास जमिनीवरुन अवैध ऊत्खनन केल्याची बाब समोर आली आहे.मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतकडुन गावठाणातील रस्त्यावरील खड्डे बुजविन्यासाठी मुरुम हा ई क्लास जागेतुन आणल्या गेला असुन यासंदर्भात तलाठ्याने ग्रा.पं.कार्यालयाकडे विचारणा केली असता ग्रा.पं.कडुन कोणतीही परवानगी तसेच चलान सादर केल्या गेली नाही.सदर मुरुम हा ग्रा.पं.कार्यालयाकडुन अवैधपणे ई क्लास जागेतुन म्हणजेच सुरु असलेल्या शेततळ्यातुन ४० ब्रास मुरुम अवैधपणे आणल्याचा अहवाल तलाठ्याने तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे.मंगरुळपीर तहसिलदार यांचेकडुन सबंधित ग्रामसेवकाला याबाबतीत पञ देण्याचे आदेशीत केले असुन यावर पुढे महसुल विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *