Aug 8, 2024

विळद : पर्यटकावर दरोडा घालणारे पाच आरोपी ताब्यात..

Robbery

नगर : विळद (ता. नगर) परिसरातील गवळीवाडा येथील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. मात्र, पर्यटकांवर दरोडा घालणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुरेश रणजीत निकम (वय ३०), विलास संजय बर्डे (वय २२), रोहित संदीप शिंदे (वय १९, सर्व रा. कात्रड, ता. राहुरी), ज्ञानेश्वर भानुदास बर्डे (वय २१, मूळ रा. कोंढवड, ता. राहुरी) व शांताराम भानुदास काळकुंड (वय १९, रा. दत्त मंदिरा शेजारी, निंबळक, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

भिस्तबाग चौकातील पंचवटी नगर येथे राहणारे वैभव सहजराव हे फिरण्यासाठी गवळीवाडा येथील धबधब्यावर गेले होते. त्यावेळी पाच अनोळखी व्यक्तींनी सहजराव यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम बळजबरीने हिस्कावून नेली. या प्रकरणी सहजराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला.