औरंगाबाद : आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सेवा समर्पण अभियान आमदार प्रशांत बंब साहेब याच्या मार्गदर्शनाखाली राबवित आहोत .मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत, या सर्व अभियानांतर्गत आज खुलताबाद तालुक्यातील विविध गावामध्ये महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साफसफाई करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यासमोर साफसफाई करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,
पंचायत समितीच्या शासकीय कार्यालया समोर साफसफाई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधीं,पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वानी 2 ऑक्टोबर रोजी आपल्या गावातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर साफसफाई करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, उपसभापती युवराज ठेंगडे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक नवनाथ बारगळ परसराम बारगळ योगेश बारगळ, मच्छिंद्र लिंगायत,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल निकुंभ, सरचिटणीस अविनाश कुलकर्णी, मोहन तुपे, पांडुरंग तुपे,अशोक तुपे, रमेश तुपे, काशिनाथ काळे, नंदु काळे, नानासाहेब अंभोरे, पांडुरंग काळे, संजय वाकळे, गणेश वाकळे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी योगेश शेळके
Ntv न्यूज मराठी
खुलताबाद, औरंगाबाद