पाथर्डी — संतांनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करा परमेश्वर प्राप्तीसाठी संत सहवास महत्त्वाचा आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या संतभूमीत आपण सर्व जन्माला आलो हे देखील आपलं भाग्य समजावे.संतांची शिकवण नेहमी सुख-समृद्धीकडे घेऊन जाणारी असून जीवनातील थोडासा वेळ तरी धर्मकार्यासाठी आणि संत सेवेसाठी प्रत्येकाने दिला पाहिजे असे आवाहन युवा कीर्तनकार अनंत महाराज तनपुरे यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला असून रविवारी दुसऱ्या दिवशीची कीर्तनरुपी सेवा अनंत महाराज यांची पार पडली.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.पाथर्डी तालुका हा मोठ-मोठ्या संत महंतांची भूमी असून यामध्ये सदगुरू गव्हाणे बाबा,राष्ट्रसंत तनपुरे बाबा,भगवान बाबा,वामनभाऊ बाबा,आनंदऋषीजी महाराज,रघुनाथ महाराज उंबरेकर या संत मंडळींनी त्यागरुपी जीवन जगून नेहमी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे,त्यांचाच आदर्श पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असून प्रत्येकाने परमार्थिक कार्यात नेहमी सहभागी होऊन धर्मकार्यासाठी पुढे यावे.या कीर्तन सेवे प्रसंगी कुमारी वैष्णवी महाराज मुखेकर,बाबासाहेब महाराज मतकर,महादेव महाराज वाढेकर यांच्यासह करंजी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.