पाथर्डी — महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवले त्यामुळे ग्रामीण भागात देखील अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक गावोगाव लोक एकत्र येऊन लोकसहभागातून मंदिर उभी करत आहेत ही निश्चितच अभिमानाचीच नव्हे तर स्वाभिमानाची बाब आहे.या मंदिर उभारणी बरोबरच त्याचे पवित्र देखील राखणे संपूर्ण गावकऱ्यांची जबाबदारी आहे.धार्मिक कार्यात ज्येष्ठांबरोबर तरुणांचा देखील सहभाग असला पाहिजे असे प्रतिपादन वेदांताचार्य सत्यवान महाराज लाटे यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील भोसे या ठिकाणी लोकसहभागातून भव्य असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात आले असून पांडुरंगाच्या मूर्तीबरोबरच या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांच्या देखील आकर्षक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली आहे.हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम बुधवारी सत्यवान महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडला.यावेळी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले सत्यवान महाराजांसारखी चारित्र्य संपन्न महात्मे वारकरी सांप्रादायात येणे ही चांगली बाब मात्र किर्तन हे अभ्यासपूर्ण सेवेचे व्यासपीठ आहे एकसारखे विनोद करण्याचे नाही.भोसे ग्रामस्थ खरोखरच खूप धार्मिक आहेत वर्षभरात अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न करणारे हे गाव असून अनेक मंदिर या ठिकाणी काही दिवसात उभी करून या ग्रामस्थांनी धार्मिक कार्यातील एकोपा सिद्ध केला आहे.या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे,पंढरीनाथ महाराज टेमकर,पांडुरंग महाराज फसले,शंकर महाराज ससे,कांता महाराज देवढे,महादेव महाराज वांढेकर,संभाजी महाराज कराळे,अविनाश महाराज अकोलकर,नवनाथ महाराज चव्हाण,माजी सभापती संभाजी पालवे,सरपंच राजेंद्र पाठक,उपसरपंच मारूती शिंदे,आनंद महाराज गिते,सेवानिवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर,आरटीओ संजय फुंदे,नामदेव नरवडे,शिवा यादव यांच्यासह भोसे गावासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.