फुलचंद भगत
वाशिम:-
मंगरुळपीर येथिल चितलांगे इण्डेण चे संचालक व महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारणी सदस्य पुरुषोत्तम ला.चितलांगे यांचा वाढदिवस 1 सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या प्रसंगी 50 जनांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला प्रधानमंत्री सुरक्षा अपघात विम्याचा शेकडो जनांनी लाभ घेतला तसेच वृक्षारोपण,फळ वाटप,तसेच बचत गटांच्या महिलांची मोफत नेत्र तपासणी हे विविध कार्यक्रम संपन्न झाले. जवळपास 1500 ते 2000 लोकांनी,सर्व राजकिय पक्षाचे नेते, भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्त्ये , मित्र परिवार, पत्रकार, लोकप्रतिनिधी, विविध संघटनेतील कार्यकर्त्यानी इत्यांदी सर्वांनी स्वत: भेटुन पुरुषोत्तमजी चितलांगे यांना शुभेच्छा दिल्यात. पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्य दरवर्षी विविध समाजाभिमुख कार्यक्राचे आयोजन करण्यात येत असते.